Upendraraj Devadhe

Upendraraj Devadhe Lives in Shahada, Maharashtra, India

Yog,Aayurved,Poems,Students LOVER YAP'S LOVER.

  • Latest
  • Popular
  • Video
#HappyDhanteras2023 #Diwali  आज पहिल्या शैक्षणिक सञातील  शेवटचा दिवस. *जिल्हा परिषद शाळा औरंगपूर  येथे एक आगळीवेगळी दिवाळी चालू वर्षी साजरी करण्यात आली.*"  त्यामध्ये सर्वप्रथम शाळेच्या मंदिरासमोर विद्यार्थिनींनी रांगोळी काढली आणि 108 पट 108 स्वदेशी दिवे लावून  बाळांनी दिव्याला प्रकाशाच्या द्योतकाला साक्षी ठेवून अगदी मनातून विश्वकल्याणासाठी विश्वप्रार्थना म्हटली .बाळाची प्रार्थना ईश्वर कबुल करीलच. त्यानंतर शालेय पोषण आहार मदतनीस बबनदादा यांना शाळेतर्फे कपडे आणि मावशींना दिवाळीनिमित्त साडी भेट देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त फराळ देण्यात आला. त्यामध्ये चिवडा सांजोरी आणि बाकरवडी अशा पदार्थांचा आस्वाद घेत बाळांनी जिव्हातृप्तीचा आनंद घेतला. मुख्याध्यापकांनी चालू वर्षाची दिवाळी  प्रदूषण मुक्त दिवाळी म्हणून साजरी का केली?तिचे पर्यावरणासाठी काय फायदे आहेत ? याबाबत मार्गदर्शन विस्तृत माहिती दिली.  सरते शेवटी विद्यार्थ्यांना दिवाळी आनंदी ,उत्साही भरभराटीची ,प्रेरणादायक जावी यासाठी मुख्याध्यापकांनी शुभेच्छा देऊन आजच्या शाळेचा शेवटचा दिवसाला गोड विराम दिला.
सदर कार्यक्रमाचा इत्यंभूत व्हिडीओ
मुख्याध्यापकांच्या *YAP'S LOVER* या
you tube चॕनेल वर पहायला मिळेल.
सर्व 'S 'LOVER s ना अर्थात STUDENTS LOVERS नी चॕनेल ला सब्सक्राईब करून चॕनेलवरील सर्व व्हिडीओंचा आस्वाद घेऊन आपल्यातील प्रेरक शक्ती जागृत करावी.
धन्यवाद 
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏
HAPPY दिवाळी from 
सर्व शिक्षक वृंदः(त्रिमूर्ती)
जि.प.शा.औरंगपूर केंद्र पाडळदा 
ता.शहादा जि.नंदुरबार .

https://youtube.com/watch?v=l1bmWmBCDgE&feature=shared

©Upendraraj Devadhe

#HappyDhanteras2023 from zp school aurangpur tal shahada dist nandurbar ,

27 View

#मराठीविचार #CheerfulMusic

जुनी पेंशन लढ्यात सहभागी न झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ......सदर रचना. #CheerfulMusic

46 View

आरपारच्या लढाईमध्ये आता तू मागे राहू नको हे होईल नी ते होईल शंका घेऊन मरू नको जी जी जी जी तू माणसाची जात असे असा कृतघ्न होऊ नको अन् कु-हाडीचा दांडा होऊन गोतास काळ ठरू नको जी जी जी जी मी कोणीतरी असे वेगळा निष्फळ बाह्या सारू नको पोकळ बांबूचे फटके मागे पडण्याची वाट पाहू नको जी जी जी जी आज आमचे स्थान जात्यात सुपात तू बसला असे तू जर नाही लढला धडाने पीठ तुझेची होणे आहे जी जी जी जी चल साक्षी हो इतिहासाचा बाष्कळ बडबड करू नको निधड्या छातीचा चल होऊन साथ आम्हाला देऊ चल कर जी जी जी जी ©Upendraraj Devadhe

#मराठीविचार #lonelynight  आरपारच्या लढाईमध्ये
आता तू मागे राहू नको
हे होईल नी ते होईल
शंका घेऊन मरू नको जी जी जी जी

तू माणसाची जात असे
असा कृतघ्न होऊ नको
अन् कु-हाडीचा दांडा होऊन
गोतास काळ ठरू नको जी जी जी जी

मी कोणीतरी असे वेगळा
निष्फळ बाह्या सारू नको
पोकळ बांबूचे फटके मागे
पडण्याची वाट पाहू नको जी जी जी जी

आज आमचे स्थान जात्यात 
सुपात तू बसला असे
तू जर नाही लढला धडाने
पीठ तुझेची होणे आहे जी जी जी जी

चल साक्षी हो इतिहासाचा
बाष्कळ बडबड करू नको
निधड्या छातीचा चल होऊन
साथ आम्हाला देऊ चल कर जी जी जी जी

©Upendraraj Devadhe

जुनी पेंशन संपात सहभागी न होणारांसाठी. #lonelynight

15 Love

तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

67 View

तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

78 View

तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

45 View

Trending Topic