जोगवा
गेली विझून स्वप्ने डोळ्यातल्याच डोळी,
करतात मौज नेते, हातात देत झोळी
अन् जोगवा मतांचा मागायचा कशाला?
मदिरेस ओतले की, जमते लगेच टोळी!
पाऊस घोषणांचा बेफाम पाडल्यावर,
जाते भुलून जनता, जी जन्मजात भोळी!
जन्मास घालते ती दोघास लोकशाही,
एकास दे दिवाळी, दुसऱ्यास खेळ होळी!
रडणे असेच नकली खोटे दुजास मारी,
वेड्यात काढती ते भाजून घेत पोळी!
जयराम धोंगडे, नांदेड ®
©Jairam Dhongade
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here