बहिण प्रत्येकाला असावी....
बाबांनी आणलेला खाऊ
एकटीच घेऊन बसायचीस
मी तुझ्या ताटातलं काही घेतलं
तर लगेच रुसून बसायचीस
अशी रुसणारी बहिण प्रत्येकाला असावी
मी हसलो
की तु हसायचीस
मी रडलो
की तु रडायची
अशी खट्याळ बहिण प्रत्येकाला असावी
जेवताना ताटातला पहिला घास
रोज तु मला भरवायचीस
कितीही भांडणं झाली
तरी मला समजून घ्यायचीस
अशी प्रेमळ बहिण प्रत्येकाला असावी
- शंतनू कोळेकर
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here